FarmersSales | दुध प्रक्रिया उद्योग
Browse by category:


Grains

Wheat,Corn,Rice,
Millet...


Vegetables and Spices
Cauliflowers,Potato,
Garlic...


Fruits, Flowers and Plants
Mango,Rose,Sprout...


Food, Milk and Dairy Products
Milk,Juice,Flour...


Farm Machinery and Equipments
Plough,Sprayer,
Harvester...


Motors, Pipes and Pumps
Motors,Irrigation,
Pumps...


Seeds, Fertilizers and Pesticide
Seeds,Fertilizer,
Pesticide...


Tractors and Vehicles
Tractors,Trailers,Farm Truck...


Farm and Storage
Storage,Farm Lands...


Animals and Animals Food

Bulls,Cows,Sheep,
Pets...
दुध प्रक्रिया उद्योग
Category: Food, Milk and Dairy Products
Quantity: Na
Posted On: 16 Jan 2017, 3:20 pm
Price: 0
Description:
दुध…लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे नैसर्गिक पेय. भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. भारत दुध उत्पादनात आघाडीवर कसा गेला याची कथा रंजक आहे. गुजरातच्या आणंद येथे १९४६ साली स्थापना करण्यात आलेल्या अमूल इंडियाने डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कल्पकतेने आणि जागतिक बँकेच्या मदतीने अवघ्या भारतात ऑपरेशन फ्लड अंतर्गत तीन टप्प्यामध्ये श्वेत क्रांती केली आणि भारत दुध उत्पादनात जगात आघाडीवर गेला. याच धर्तीवर भारतभर सहकार तत्वावर विविध सहकारी दुध सोसायट्यांची किंवा संघांची स्थापना झाली. महाराष्ट्रातही विविध दुध सहकारी संघ कार्यरत आहेत. दुधामध्ये स्निग्धांश अधिक प्रमाणात असतो. दुधामधील स्निग्धांशावर किंवा मलईवर दुधाची गुणवत्ता ठरते आणि गुणवत्तेवरून किंमत निश्चित होत असते. म्हणूनच दुधाचे अर्थकारण स्निग्धांशाच्या भोवतीच फिरते असे म्हटले तरी वावगे ठरू नये. हे लक्षात घेत गायी किंवा म्हशींना दर्जेदार आहार देणे गरजेचे आहे. या मध्ये सकस चारा आणि इतर अन्नघटकांचा सामावेश असतो. दुधाचे बॅच पाश्चारायझर दुधाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी दूध निर्जंतुक करणे आवश्यवक असते. त्यासाठीची प्रभावशील प्रक्रिया म्हणजे दुधाचे पाश्च रायझेशन करणे किंवा दूध तापवणे. हि प्रक्रिया अत्यंत महत्वाची असल्यामुळे काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत दूध साधारणतः ७२ अंश सेल्सिअस तापमानावर १५ सेकंदांसाठी किंवा ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटे तापवून थंड करण्यात येते. दूध तापवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅच पाश्च रायझर (एलटीएलटी) किंवा प्लेट पाश्चुरायझर (एचटीएसटी) चा वापर सर्वत्र होताना दिसून येतो. बॅच पाश्चशरायझर हे उपकरण लहान स्तरावर दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध उत्पादकास अत्यंत फायदेशीर आहे. या उपकरणात दूध ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटांसाठी तापवून निर्जंतुक करता येते. उपकरणाची क्षमता ५० ते ५०० लिटर असून, यातील दूध गॅस किंवा वाफेच्या ऊर्जेवर तापवले जाते. बॅच पाश्चीरायझर हे उपकरण गोलाकार आकारात उपलब्ध आहे. हे स्टेनलेस स्टीलच्या दुहेरी पत्र्याचे बनलेले आहे. दोन पत्र्यांदरम्यान गरम पाणी किंवा वाफ फिरवली जाऊन आतील दूध अप्रत्यक्षरीत्या गरम होते. यामुळे दुधाची करपण्याची किंवा दूध लागण्याची शक्याता कमी असते. तापलेले दूध याच उपकरणातून थंडदेखील करता येते. उपकरण वापरण्यास सोपे व सुरक्षित असून, दही, आइस्क्रीम, पनीर व तत्सम पदार्थ करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. उपकरणातील दूध एकसमान तापवण्यासाठी उपकरणात एक ढवळणीदेखील पुरवलेली असते. क्रीम सेपरेटर दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलई सेपरेटर वापरतात. या यंत्राने पाच लिटर प्रति तास ते एक लाख लिटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने दुधातील मलई वेगळी करता येते. दुग्धजन्य पदार्थांची मागणी तस पाहायला गेल तर दुध आणि दुग्धजन्य पदार्थांना नेहमीच मागणी आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींना दुधाचे सेवन करायला आवडते. दुधापासून बनविले जाणारे विविध पदार्थ यामध्ये पनीर,मावा, श्रीखंड,दही, तूप, लोणी, ताक इत्यादींचा समावेश होतो. गाव, शहर अशा विविध ठिकाणी दुधाला असलेली मागणी दिवसागणिक वाढते आहे. घर, हॉटेल, ढाबे अशा विविध ठिकाणी दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी दिवसागणिक वाढत आहे. हे लक्षात घेत दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती हा व्यवसायासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यंत्रसामग्रीची गरज छोट्या यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांच्या गटांना दूध प्रक्रियेच्या दृष्टीने लघुउद्योगांकडे वळण्यास मोठी संधी आहे. खवा, पनीर, पेढा, श्रीखंड, लस्सी, क्रीम सेपरेशनसाठी लहान स्वरूपातील यंत्रे उपलब्ध आहेत. विविध पदार्थांसाठी वेगवेगळ्या क्षमतेची बांधणीची यंत्रे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आपल्या उत्पादनानुसार ती विकत घेता येतील. खवा उत्पादनासाठी कमीत कमी ४० हजारांपासून ते २.५ लाखांपर्यंत यंत्रे उपलब्ध आहेत. पनीरसाठी साधा पनीर प्रेस १५-२० हजार, तर न्यूमॅटिक प्रेस हा ५० हजार ते २.५ लाखांपर्यंत मिळू शकेल. दुधातील साय वेगळी करण्यासाठी क्रीम सेपरेटरची किंमत २५ ते ४० हजारांपर्यंत आहेत. सुरवातीस एक किंवा दोन पदार्थांसाठी लागणारी यंत्रे खरेदी करून, गरजेनुसार इतर पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे विकत घेता येतील. दुग्धपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण दुग्ध महाविद्यालय, पुसद विविध जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्र गुजरात – आणंद दुग्धतंत्र प्रशिक्षण महाविद्यालय राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा या आणि विविध संस्थांमध्ये दुग्धतंत्र प्रशिक्षण कार्यशाळा आणि अभ्यासक्रमांचे आयोजन केले जाते. आपणांस या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण ७७७५००८८११ या क्रमांकावर फोन करून यासंदर्भातील आधीक माहिती मिळवू शकता.
Farmerssales.com
Member since 2 years ago
Address:
Ahmednagar
Pincode:
414001
District:
Ahmednagar
State:
Maharashtra
Contact: 7775008811
Save an Ad
Send a Message

Send a Message