FarmersSales | कांदा सल्ला
Browse by category:


Grains

Wheat,Corn,Rice,
Millet...


Vegetables and Spices
Cauliflowers,Potato,
Garlic...


Fruits, Flowers and Plants
Mango,Rose,Sprout...


Food, Milk and Dairy Products
Milk,Juice,Flour...


Farm Machinery and Equipments
Plough,Sprayer,
Harvester...


Motors, Pipes and Pumps
Motors,Irrigation,
Pumps...


Seeds, Fertilizers and Pesticide
Seeds,Fertilizer,
Pesticide...


Tractors and Vehicles
Tractors,Trailers,Farm Truck...


Farm and Storage
Storage,Farm Lands...


Animals and Animals Food

Bulls,Cows,Sheep,
Pets...
कांदा सल्ला
Category: Vegetables And Spices
Quantity: Na
Posted On: 30 Jan 2017, 6:04 pm
Price: 0
Description:
रांगडा, रब्बी कांदा, लसूण आणि बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यांची रोपे सध्या शेतात उभी आहेत. जानेवारी महिन्यात फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. फुलकिड्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता योग्य काळजी घेतली पाहिजे. रांगडा कांद्याच्या उभा पिकाकरिता - पुनर्लागणीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी सूक्ष्म द्रव्यांची ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पानांवर फवारणी करावी. - कीड व रोग यांच्या नियंत्रणाकरिता आवश्‍यकतेनुसार कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर अधिक ट्रायसायक्‍लोझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पानांवर फवारावे. या फवारणीनंतर १५ दिवसांनी आवश्‍यकतेनुसार प्रोफेनोफॉस १ मि.लि. प्रति लिटर अधिक हेक्‍साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. - वरील फवारणीनंतरसुद्धा फुलकिडे व करपा रोगाचे नियंत्रण न झाल्यास, ५५ दिवसांनी फिप्रोनील १ मि.लि. प्रति लिटर अधिक प्रोपिकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. - पुनर्लागवडीनंतर ११०-११५ दिवसांपर्यंत आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. काढणीपूर्वी १० दिवस आधी पाणी देणे बंद करावे. रब्बी कांद्याच्या पुनर्लागवडीकरिता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रोपांची पुनर्लागवड केलेली नाही, त्यांनी ४५-५० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करून घ्यावी. - पुनर्लागवडीकरीता रोप निवडताना योग्य काळजी घेतली पाहिजे. खूप जास्त वाढ झालेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यावर त्यांच्या पानांच्या शेंड्याकडील एकतृतीयांश भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा. - बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. - दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. - पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी नत्र खताचा पहिला हप्ता ३५ किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात द्यावा. - नत्र खताचा दुसरा हप्ता ३५ किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावी. 6. पुनर्लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी. 7. कीड व रोगाच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. त्यांच्या प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणाकरिता आवश्‍यकतेनुसार कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्‍लाझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारावे. - पहिल्या फवारणीच्या १५ दिवसांनंतर आवश्‍यकतेनुसार, प्रोफेनोफॉस १ मि.लि. अधिक हेक्‍साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात गरज भासल्यास फवारणी करावी. - वरील फवारणीनंतरसुद्धा फुलकिडे व करपा रोगाचे नियंत्रण झाले नसल्यास, फिप्रोनील १ मि.लि. अधिक प्रोपिकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी फवारणी करावी. - पुनर्लागवडीनंतर ४५ आणि ७५ दिवसांनी, फवारणीद्वारे सूक्ष्म द्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात द्यावीत. - पिकाला आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. लसणाच्या उभ्या पिकाकरिता... - लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्म द्रव्ये फवारणीद्वारे ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात द्यावीत. - कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्‍लाझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पवारणी करण्याची शिफारस आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास, १५ दिवसांनी प्रोफेनोफॉस १ मि.ली. अधिक हेक्झाकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. संपर्क ः ०२१३५- २२२०२६ (कांदा, लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, जि. पुणे)
Farmerssales.com
Member since 2 years ago
Address:
कांदा, लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, जि. पुणे)
Pincode:
410505
District:
Pune
State:
Maharashtra
Contact: ०२१३५- २२२०२६
Save an Ad
Send a Message

Send a Message